‘झोया फॅक्टर’च्या नव्या पोस्टरवर सलमान-सोनम अनोखा अंदाज


लवकरच ‘झोया फॅक्टर’ या हिंदी चित्रपटातून दाक्षिणात्य सुपरस्टार सलमान दुलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री सोनम कपूर झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्याच आले आहे.

क्रिकेटच्या स्टेडियममधील सलमान आणि सोनमची खास झलक या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. चित्रपटाची नवी रिलीज डेटही या पोस्टरसोबतच जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट सुरूवातीला १४ जूनला प्रदर्शित होणार होता. मात्र, वर्ल्ड कपच्या कारणास्तव ही रिलीज डेट बदलण्यात आली.

अनुजा चौहान यांच्या ‘झोया फॅक्टर’ या पुस्तकावर आधारित अभिषेक शर्मा यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट असणार आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराची भूमिका चित्रपटात सलमान साकारणार आहे. तर जाहिरात एजन्सीमध्ये काम करणाऱ्या तरूणीच्या भूमिकेत सोनम दिसणार आहे.

Leave a Comment