या दिवशी रिलीज होणार प्रभुदेवा-तमन्नाचा खामोशी - Majha Paper

या दिवशी रिलीज होणार प्रभुदेवा-तमन्नाचा खामोशी


आगामी ‘खामोशी’ चित्रपटात दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभूदेवा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच या चित्रपटाची रिलीज डेट आता बदलण्यात आली आहे.


हा चित्रपट येत्या ३१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. याबद्दलची अधिकृत घोषणादेखील करण्यात आली होती. पण ही रिलीज डेट आता पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट आता १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे एक नवे पोस्टर शेअर करत याबद्दलची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चक्री टॉलेटी यांनी केले असून हा एक हॉरर चित्रपट असल्याने चाहत्यांना या चित्रपटाबाबत आतुरता आहे.

Leave a Comment