‘या’ क्रमांकावर धोनीने खेळल्यास भारताला होईल फायदा


नवी दिल्ली – अवघे काहीच दिवस एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी उरले असून अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी या पार्श्वभूमीवर आपली मते मांडण्यास सुरुवात केली आहे. विश्वचषक स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी महेंद्रसिंह धोनी हाच योग्य असल्याचे मत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने मांडले आहे. पण चर्चेत असलेल्या चौथ्या क्रमांकासाठीच्या स्थानावर कोणता फलंदाज खेळेल हे माहीत नसल्याचे सचिनने म्हटले आहे.

कोणता फलंदाज पाचव्या क्रमांकासाठी योग्य राहील यावर बोलताना सचिन म्हणाला, की पहिल्या ४ फलंदाजांवर भारताची मोठी मदार असले. तर फिनिशरची भूमिका त्या पुढील फलंदाजांना पार पाडावी लागणार असल्यामुळे पाचव्या क्रमांकाची जबाबदारी मोठी असून, त्या जागेनर धोनी योग्य आहे. धोनी हा एक अनुभवी आणि वेळेप्रसंगी वादळी खेळी करण्यास सक्षम आहे. तो सामन्याच्या अखेरपर्यंत आपल्या खेळीच्या जोरावर भारताचा धावफलक हालता ठेवण्याची जबाबदारी चोख पार पाडू शकतो.

Leave a Comment