या महिलने चक्क ६०० वर्ष जुन्या दगडी पुलासोबत लग्न!


आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी जगभरातील अनेक तरुणी प्रयत्न करतात. पण म्हणावे तसे हे काम सोपे नाही. काहीजणींचा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी खटाटोप सुरुच असतो. अशीच एक अजब घटना ऑस्ट्रेलियात घडली आहे. पण आम्ही जे तुम्हाला सांगणार आहोत त्यावर तुम्हाला विश्वास ठेवणे थोडे जडच जाईल.

आदर्श जोडीदाराच्या शोधात ऑस्ट्रेलियातील एक महिला होती. या महिलेचा जोडीदाराचा शोध आता थांबला आहे. एक शक्तिशाली, स्थिर आणि शांत पुरूषाचा या महिलेचा लग्नासाठी शोध सुरू होता. फ्रान्समध्ये जाऊन तिचा हा शोध संपला आहे. २०१३ मध्ये दक्षिण फ्रान्सच्या सेरेतमध्ये टेक नदीवर असलेल्या ‘ले पोंट डु डायबल'(द डेविल्स ब्रीज) सोबत सिडनीमध्ये राहणारी जोडी रोजने लग्न करून सर्वांनाच हैराण केले. रोज ज्यावेळी फ्रान्सची सैर करत होती, त्यावेळी तिला १४व्या शतकातील पूलावर जाण्याची संधी मिळाली. दरम्यान तिचे या पुलावर मन आले.

तिच्या नवऱ्यामध्ये रोजला ज्या गोष्टी हव्या होत्या, तिला या पुलामध्ये त्या दिसल्या आणि पुलाशी तिने लग्न केले. रोजच्या १४ लोक या आगळ्या-वेगळ्या लग्नात सहभागी झाले होते. त्याचबरोबर यादरम्यान शेजारील शहर सेंट-जीन-डे-फॉसच्या मेअरनी नवरी-नवरदेवाला (पूलाला) आशीर्वाद दिला होता.

रोज डेली मेलसोबत बोलताना सांगते की, तिच्यासाठी पुलासोबत लग्न करणे एक वेगळा आणि शानदार अनुभव होता. लग्नाच्या दिवशी तिला नर्व्हसही वाटत होते आणि उत्साहितही वाटत होते. कारण स्थिर आणि शांत नवरदेव होता. रोज लग्नाच्या ६ वर्षांनंतरही लग्नाची अंगठी अजूनही घालते.

आपल्या ब्लॉगमध्ये ‘रोज’ ने तिच्या नवरदेवाबाबत लिहिले की, मला तो पृथ्वीशी कनेक्टेड असल्याची जाणीव करून देतो आणि भरकटण्यापासून मला रोखतो. स्थिर आणि जमिनीशी तो जुळलेला आहे. मला तो स्वर्गाचा आनंद देतो. मला त्याच्या मार्गावर चालण्यासाठी तो प्रेरित करतो. त्याच्याप्रति मी पूर्णपणे समर्पित आहे. भलेही या लग्नाला फ्रान्समध्ये कायदेशीर मान्यता नाही, पण आमचे नाते फार मजबूत आहे.

Leave a Comment