अशाप्रकारची सुविधा देणारे ताजमहल देशातील पहिलेच स्मारक


महिलांना स्तनपानासाठी ‘ब्रेस्टफीडिंग रूम’ बनवल्या जाणार असल्यामुळे ताजमहल देशातील पहिले असे स्मारक ठरणार आहे. याव्यतिरिक्त अशी सुविधा आग्र्याचा किल्ला आणि फतेहपूर सीकरीमध्येही दिली जाणार आहे. याबाबत माहिती देताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण(एएसआय) अधिकारी वसंत कुमार स्वर्णकार यांनी सांगितले की, स्मारकामध्ये असणाऱ्या पायऱ्यांच्या खाली आपल्या लहान मुलांना फिरण्यासाठी सोबत घेऊन येणाऱ्या महिलांना अनेक वेळेस मुलांना स्तनपान करावे लागत होते. आम्हाला या गोष्टीची त्यांची ही अडचण पाहून कल्पना आली.

स्वर्णकारनुसार, त्या लाखो महिलांना बेबी फीडिंग रूमचा फायदा होईल ज्या आपल्या मुलांना घेऊन येथे येतात. आपल्या बाळाला दुध पाजणे प्रत्येक आईचा अधिकार असल्यामुळे त्यांच्यासाठी चांगली व्यवस्था असणे आवश्यक आहे. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे.

भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसार, ताजमहल असे भारतातील 36 हजार स्मारकांमधून पहिले स्मारक असेल, जिथे अशा प्रकारची सुविधा देण्यात येईल. जगातील इतर स्मारकांना अशा प्रकारच्या सुविधा पाहून प्रेरणा मिळेल आणि ते सुद्धा ही सुविधा सुरू करतील.

मागील वर्षी कोलकातामध्ये बेस्टफीडिंगसंबंधीत एक प्रकरण समोर आले होते. बाळाला पाजण्यासाठी महिलेला येथील एका मॉलमधील टॉयलेटमध्ये जायला सांगितले होते. त्या महिलेने यावर संबधित अधिकाऱ्याकडे तक्रार केली पण त्यावर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे महिला त्या मॉलसमोर उपोषणासाठी बसली होती.