यामुळे सलमानला झाली लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण


अनेक चित्रपटांत सलमान खान आणि मराठमोळे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकत्र काम केले आहे. ही जोडी ‘मैने प्यार किया’, ‘साजन’, आणि ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटात एकत्र झळकली. सलमानने अशातच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

१६ डिसेंबर २००४ रोजी लक्ष्मीकांत यांचे निधन झाले. पण ते त्यांच्या अभिनयामुळे आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. अभिनेता सलमान खाननेही आता एका डान्स शोच्या चित्रीकरणादरम्यान लक्ष्मीकांत यांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. लक्ष्मीकांत यांचा मैंने प्यार किया चित्रपटाच्या यशात महत्त्वाचा वाटा असल्याचे सलमानने म्हटले आहे.

‘साजन चित्रपटातील ‘तुमसे मिलने की तमन्ना है’ गाण्यावर या डान्स शोमधील एका स्पर्धकाने डान्स केला होता. सलमानसोबत या गाण्यात लक्ष्मीकांतदेखील झळकले असल्यामुळे त्यांच्या आठवणीत सलमान भावूक झाला. खूप आठवणी या गाण्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. माझ्यासोबत माझा जिवलग मित्र लक्ष्मीकांत बेर्डे यात झळकले होते, असे सलमानने यावेळी म्हटले. आज आपल्यात ते नसले तरीही हे गाणे मला कायम त्यांची आठवण करून देईल, असे सलमान पुढे म्हणाला.

Leave a Comment