शाहिदच्या कबीर सिंहमधील पहिले गाणे रिलीज


लवकरच ‘कबीर सिंह’ या चित्रपटाच्या माध्यमातून शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेतय दाक्षिणात्य ‘अर्जून रेड्डी’ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असणार आहे. प्रेक्षकांचा चित्रपटाच्या पहिल्या लूकपासून ट्रेलरपर्यंत सर्वालाच उत्तम प्रतिसाद मिळाला.

आता नुकतेच या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे ‘बेख्याली’ असे शीर्षक आहे. सचेत टंडन यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. तर हे गाणे इरशाद कामिल यांनी लिहिले आहे. शाहिद आणि कियाराच्या प्रेमाची खास झलक यात पाहायला मिळत आहे.

अर्जून रेड्डी चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, मुराद खेतानी, क्रिशन कुमार आणि आश्विन वर्दे हे करणार आहेत. येत्या २१ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment