कंगनाने पकोडे बनवुन साजरा केला मोदींचा विजय


भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूकीत बहुमत मिळवत बाजी मारल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्यावर राजकीय क्षेत्रातील लोकांसोबत बॉलिवूड जगतानेही अभिनंदनाचा वर्षाव करीत जल्लोष करत आहेत. यात बॉलिवूडची क्विन कंगना राणावत हिने मोदींचा विजय अनोख्या पध्दतीने साजरा केला. घरी एका पार्टीचे तिने आयोजन केले होते. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले.

ट्विटरवर कंगनाच्या घरी झालेल्या पार्टीचे फोटो तिची बहिण रंगोली चंदेलने पोस्ट केले आहेत. पोस्टमध्ये तिने लिहिले आहे कि, जेव्हा जेव्हा कंगना खूश असते फक्त तेव्हाच खाद्यपदार्थ बनवते. नरेंद्र मोदी यांच्या विजयाबद्दल आज आनंदित होऊन पार्टी दिली. जय हिंद, जय भारत. रंगोलीच्या या ट्विटवरुन लक्षात येते की, मोदींच्या विजयमुळे कंगना किती खूश झाली आहे. मोदींच्या विजयाचा कंगना रानावत शिवाय बॉलिवूडच्या विवेक ओबेरॉय, पायल रोहतगी आणि शिल्पा शेट्टी यांना आनंद झाला आहे. आपल्या पध्दतीने त्यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment