किशोर कुमारांच्या बायोपिकमध्ये अदनान सामी झळकणार ?


बी टाऊनमधील बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या आणि आवाजाचे जादुगार अशी ओळख असलेल्या अभ्यास कुमार गांगुली अर्थात किशोर कुमार यांच्या आयुष्यवर आधारित चित्रपट बनविण्याची तयारी खुप दिवसापासून सुरु होती. त्यातच या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बसू आणि रणबीर कपूर यात मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा होती. पण या चित्रपटाची निर्मिती दुसऱ्याच दिग्दर्शकांसोबत होणार असल्याची चर्चा आता सुरु आहे. प्रसिद्ध गायक अदनान सामी यात किशोर कुमार यांची भूमिका साकारणार आहे.

अदनान सामी हे किशोर कुमार यांच्या व्यक्तीरेखेसाठी योग्य कलाकार असल्याचे सांगितले जाते. अभिनयाची देखील त्याला उत्तम जाण आहे. तो एक चतुरस्त्र गायक असून आपल्या भारदस्त आवाजाने लोकांना त्याने भुरळ घातली आहे. किशोर कुमार यांची काही अजरामर गाणी या चित्रपटात रिक्रिएट करण्यात येणार आहेत. अदनान ही गाणी त्याच्या आवाजात असतील.

अदनान सामी यांनी अलिकडेच एका गाण्याच्या शोमध्ये किशोर कुमार यांच्या काही क्लासिक गाण्याचे रिक्रिएशन केले होते. त्यामुळे किशोर कुमारांच्या बायोपिकसाठी अदनान सामीची निवड योग्य ठरु शकते असा विश्वास निर्मात्यांना वाटतो. लवकरच याची अधिकृत घोषणा होईल.

Leave a Comment