या चित्रपटात झळकणार मिथून चक्रवर्तींचा मुलगा


आपल्या जबरदस्त अंदाजाने अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी अनेकांना भूरळ घातली. आजही मोठ्या प्रमाणात त्यांच्या चाहत्यांची संख्या आहे. नुकतेच ताश्कंत फाईल्स चित्रपटातून मिथून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता त्यांचा मुलगाही यापाठोपाठ प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.

लवकरच बॉलिवूडमध्ये मिथून यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती पदार्पण करणार आहे. तो ‘बॅड बॉय’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत आपले नशीब आजमावणार आहे. यात अमरीन कुरेशी नमाशीच्या अपोझिट झळकणार आहे. निर्माता साजिद कुरेशी यांची अमरीन ही मुलगी आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई आणि बंगळुरूमध्ये केले जाणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी करणार आहेत. निर्माते या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले, जेव्हा हा चित्रपट नमाशीने साईन केला तेव्हा मिथून बाहेर देशात होते. पण त्यांनी भारतात परतताच आमची भेट घेऊन याबद्दल चर्चा केली. हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment