गुरुवारी दिवसभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात ३२ लाख ट्विट


नवी दिल्ली – लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर अनेकांना निकालाबाबत उत्सुकता होती. ट्विटरवर गुरुवारी निकाल जाहीर होताना आणि निकालानंतर अनेकजण सक्रिय असल्यामुळे निवडणुकीबाबत गुरुवारी एकाच दिवशी ३२ लाख ट्विट झाले आहेत.

एकूण ३९.६ कोटी ट्विट लोकसभा निवडणुकीदरम्यान जानेवारीपासून करण्यात आले. यापूर्वी ५.६ कोटीहून अधिक ट्विट २०१४ च्या निवडणुकीदरम्यान करण्यात आले होते. पण त्यावेळी वापरकर्त्यांची संख्या कमी होती. ३२ लाख ट्विट गुरुवारी दिवसभरात निवडणुकीसंदर्भात वापरकर्त्यांनी केले आहेत. यातील एक तृतीयांश ट्विट हे दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत करण्यात आले आहेत. या कालावधीतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजय झाल्याबद्दल ट्विट केले होते. #LokSabhaElections2019 हा ट्रेण्ड १ जानेवारी २०१९ ते २३ मे २०१९ कालावधीत सुरू होता. त्यामध्ये ट्विट वापरकर्त्यांनी उमेदवार, नागरिक आणि राजकीय पक्षाबाबत चर्चा केली.

Leave a Comment