मोदींना शुभेच्छा देऊन शबानी आझमींना झाला पश्चाताप


भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या प्रचंड यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. मोदींचे बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रीटीजनीदेखील अभिनंदन केले. मोदी यांना ट्विट करुन विजयाबद्दल अभिनेत्री शबाना आझमी यांनी शुभेच्छा दिल्या.

मोदी यांना शबाना आझमी यांनी शुभेच्छा दिल्या खऱ्या पण ही गोष्ट कट्टर मोदी समर्थकांच्या पचनी पडलेली दिसत नाही. युजर्सनी शबाना यांना ट्रोल करायला सुरूवात केली आहे. त्यांना काहींनी पाकिस्तानला जाण्याचा सल्ला दिला आहे, तर त्यांना काहींनी डोळे पुसण्यासाठी रुमाल भेट म्हणून पाठवला आहे. तर त्यांना काही जणांनी काळजावर दगड ठेवून ट्विट करणारी असे उपरोधाने म्हटले आहे. त्यांना काही युजरनी भारत कधी सोडणार आहात असे विचारले आहे.

यंदाच्या निवडणूकीत बेगुसराई लोकसभा मतदार संघात जाऊन शबाना आझमी यांनी कन्हैय्या कुमार याचा प्रचार केला होता. डाव्या विचारांसाठी त्या नेहमीच ओळखल्या जातात. सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रियादेखील त्या देत असतात. तिथेही त्यांना ट्रोल करणारे असतातच. एकंदरीत मोदी समर्थक या ट्विटला खिलाडूवृत्तीने पाहायला तयार नाहीत.

Leave a Comment