भाजप नेते प्रसाद लाड यांना मनसे कार्यकर्त्यांची धमकी !


मुंबई – भाजपला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर मनसेच्या विरोधात भाजपकडून ‘लाव रे ते पोस्टर’ म्हणणारे फ्लेक्स सायन परिसरात लावण्यात आले होते. राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून यावर हे पोस्टर तात्काळ हटविण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. पण भाजप नेते प्रसाद लाड यांना काही कार्यकर्त्यांनी फोन करून धमकी दिल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे.

प्रसाद लाड यांना फोन करून काही मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करणारे पोस्टर काढा अन्यथा तुम्हाला बघून घेऊ, असे म्हणत शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान मनसेकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपच्या विरोधात ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणून कॅम्पेन चालवली जात होती.

प्रसाद लाड यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या शिवीगाळ व धमकीवर बोलताना म्हटले आहरे आपण राज ठाकरे यांच्यावर टीका केली नसून आजही त्यांचा आमच्या मनात आदर आहे. पण असे असतानाही पोस्टरवर मनसे कार्यकर्त्यांना राग येत असेल तर त्यांनी समोर येऊन सामना करावा, असे आव्हान प्रसाद लाड यांनी केले आहे.

Leave a Comment