हुंडा घेण्यास नकार दिला म्हणून नवरदेवाला दिली चक्क १ लाखांची १ हजार पुस्तके!


आपल्या देशात हुंडा घेणे आणि देणे कायद्याने गुन्हा असल्याचे आपल्या सर्वांना माहितच आहे. पण तरी देखील आजच्या घडीला देखील हुड्यांसाठी नवविवाहिताचा छळ देखील केला जातो. हुंड्याच्या स्वरुपात हव्या असलेल्या सर्व गोष्टी हुंड्याच्या स्वरूपात मागितल्या जातात. पण, एक वेगळीच घटना पश्चिम बंगालच्या सोनारपूरमध्ये घडली आहे. हुंडा घेण्यास येथील एका शिक्षकाने नकार दिल्यानंतर जेव्हा वरात लग्न स्थळी पोहोचली तेव्हा नवरदेवाला वधूकडील लोकांनी १ लाख रूपये किंमतीची १ हजार पुस्तके गिफ्ट दिली.

पश्चिमबंगालच्या खेजुरीमध्ये सूर्यकांत नावाच्या शिक्षकाचे लग्न पार पडले. मंगल कार्यालयात तो जेव्हा वरात घेऊन पोहोचला तेव्हा पुस्तकांचा मोठा ढीग आत पडला होता. सूर्यकांत हे पाहून हैराण झाला. ही पुस्तके ती होती जी त्याला सासरकडून गिफ्ट देण्यात आली होती.

सूर्यकांत सांगतो की, मी कोणत्याही प्रकारचा हुंडा घेणार नाही, असे आधीच सांगितले होते. पण मी हॉलमध्ये जेव्हा पोहोचलो तेव्हा मी हैराण झालो. वाचण्याची सूर्यकांतला खूप आवड आहे. प्रियंका असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. ती सांगते की, तिला फार आनंद हुंडा नाकारल्याने झाला. वाचनाची तिलाही आवड आहे. सध्या बीए तिसऱ्या वर्षाला ती आहे. बंगाली साहित्य या पुस्तकांमध्ये आहे. रविंद्रनाथ टागोर, बकिंमचंद्र चट्टोपाध्याय आणि शरतचंद्र चट्टोपाध्याय यांची यात पुस्तके आहेत.

Leave a Comment