अभिनेता विवेक ओबेरॉयला जीवे मारण्याची धमकी


अभिनेता विवेक ओबेरॉयला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून त्याच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली असून कोणाकडून धमकी देण्यात आली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. विवेकला गेल्या काही दिवसांपासून निनावी फोन येत असून त्याद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. विवेकने या धमक्यांनंतर पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. मुंबई पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विवेकच्या सुरक्षेसाठी दोन पोलीस कॉन्स्टेबल तैनात केले आहेत.

विवेक एग्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर केलेल्या एका मीममुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विवेकने ट्विटरवर एग्झिट पोल म्हणजे अंतिम निकाल नव्हे हे गमतीशीरपणे सांगणारा सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा मीम पोस्ट केला होता. राजकीय नेत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी त्यावरून त्याच्यावर टीकेची झोड उठवली तर त्याला राज्य व केंद्रीय महिला आयोगाने नोटीसही पाठवली आहे. सर्वच स्तरांतून होणाऱ्या टीकांच्या पार्श्वभूमीवर विवेकने तो ट्विट डिलीट करत माफी मागितली.

Leave a Comment