वयाच्या चौथ्या वर्षापासून मेकअप करणाऱ्या ब्यूटी ब्लॉगरने खरेदी केली लक्झरी कार


बँकॉक – केवळ वयाच्या १२ व्या वर्षीच थायलंडमधील नॅथनन सनुनरात ही नामांकित ब्यूटी ब्लॉगर बनली असून, तिने गत महिन्यात तिच्या १२ व्या वाढदिवशी आवडीची लक्झरी कार खरेदी केली. तथापि, ती ही कार चालवू शकत नाही. तिला कार चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी ८ वर्षे प्रतीक्षा करावी लागेल. १० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स सोशल मीडियावर असलेल्या नॅथननने स्वत:ला बीएमडब्ल्यू-७ सिरीजची कार भेट दिली. ही कार दीड लाख पौंड म्हणजे सुमारे एक कोटी ३३ लाख रुपयांची आहे. याबाबत माहिती देताना चोनबुरी राज्यात राहणाऱ्या नॅथननने सांगितले की, कारच्या पॅडलपर्यंत माझे पाय पाेहाेचू शकत नसल्यामुळे वाहन चालवण्याचा परवाना मिळेल मी तेव्हाच माझ्या स्वप्नातील कार चालवण्याचे स्वप्न पूर्ण करेल. ताेपर्यंत माझे आई-वडील ती चालवतील.

ती ३ वर्षांची असतानाच नॅथननने पहिल्यांदा मेकअप ब्रश हाती घेतला हाेता व तिचा पहिला यू-ट्यूब व्हिडिअो ४ वर्षांची असताना आला. ती तेव्हापासून ऑनलाइन मेकअप सेलिब्रिटी बनली आहे. अाता ती अनेक फॅशन इव्हेंट्समध्ये सहभागी हाेते व शाळेतही जाते. गतवर्षी लंडन फॅशन वीकमध्येही सहभागी हाेऊन तिने अनेक माॅडेल्सचा मेकअप केला हाेता.

नॅथननने सांगितले की, चार वर्षांची मी हाेते तेव्हापासून दररोज मेकअप करत आहे. मी तेव्हाच माझा पहिला मेकअप ट्यूटोरियल व्हिडिओ यू-ट्यूबवर पोस्ट केला हाेता. मेकअप करणे मला खूप आवडते. त्यामुळेच मी मेकअप आर्टिस्ट बनण्याचे स्वप्न पाहिले. प्रत्येक प्रकारचा लूक मी वापरू इच्छिते. नैसर्गिक, फॅन्सी व स्पेशल इफेक्टसदेखील. गतवर्षी लंडन फॅशन वीकमध्ये सहभागी हाेण्याची संधी मिळणे माझ्यासाठी जॅकपॉटच हाेता. मी तेथे मुले व माेठ्या मॉडेल्सचा मेकअप केला व खूप काही शिकले. यू-ट्यूबवर झाले लाखाे फॉलोअर्स आहेत. तसे मला बीएमडब्ल्यूची कार खूप आवडते. मात्र, माेठी झाल्यावर एके दिवशी पोर्शे कार खरेदी करण्याची इच्छा आहे. नॅथननची आई नाचाने सांगितले की, आम्ही तिला तिच्या कामासाठी नेहमीच प्राेत्साहन देताे. ती खूप समंजस असून, आम्हाला तिचा अभिमान वाटताे. कारण तिच्यामुळेच लाेक आम्हाला अाेळखू लागले आहेत.

Leave a Comment