
नवी दिल्ली – अभिनेते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याविषयी राज्यसभा सदस्य अमरसिंह यांनी धक्कादायक वक्तव्य केले असून ते म्हणाले, कायदा मोदींच्या नेतृत्वात आपले काम करेल आणि पनामा पेपर्स प्रकरणी न्याय होईल. पाकिस्तानचे पंतप्रधान जर या प्रकरणी कारागृहात जात असतील तर या प्रकरणात भारतातील ज्यांचे नाव आले, त्यांनाही शिक्षा होऊ शकते.
पनामा पेपर्स प्रकरणी अमिताभ बच्चन यांनाही होऊ शकते शिक्षा; अमर सिंह
अमिताभ बच्चन यांचे पनामा पेपर्स प्रकरणात नाव आले होते. अमरसिंह यांचा इशारा हा यावरुन त्यांच्याकडे असल्याचे संकेत त्यांनी दिले. अमर सिंह पुढे म्हणाले, राजकारणात जेव्हा अमिताभ बच्चन आले होते, त्यांनी तेव्हा हेमवती नंदन बहुगुणा सारख्या प्रतिष्ठीत नेत्यांचा पराभव केला होता. त्यांनी तरीही राजकारण सोडले.
अमरसिंह म्हणाले, त्यांनी त्यावेळी असे का केले, हे मला देखील सांगता येणार नाही. पण हे लक्षात आपणाला घ्यावे लागेल की चित्रपट करत असताना अभिनेत्यासोबत एक मदतनीस असतो, जो अभिनेत्याचा घामही पूसतो. पण असे राजकारणात होत नाही. स्वत:ची जागा येथे तुम्हाला तयार करावी लागते. त्यातच तुम्हाला श्रीमंत-गरीब या सर्वांना भेटावे लागते.
