लठ्ठपणामुळे पत्नीने सोडले, आता झाला बॉडी बिल्डर


एखाद्या व्यक्तिचे ब्रेकअप झाल्यावर त्याचे आयुष्य उद्धवस्त होते असे म्हणतात, पण काहीजण यातून धडा घेत काहीतरी सकारात्मक करुन भरपूर काही मिळवतात. जपानमधील एका व्यक्तीने असेच काहीसे करुन दाखवले आहे, ज्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. हा जपानी व्यक्ती लठ्ठ असल्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली. पण त्यानंतर त्याचे आयुष्यच पार गेले.


पाच वर्षांपूर्वी जपानमधील शिराप्योनचा पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. यामागे त्याच्या लठ्ठपणाचे कारण होते. या कारणाने पत्नीने सोडल्यामुळे शिराप्योनला फार दु:ख झाले आणि तो नशेच्या आहारी गेला. तो दु:खं विसरण्यासाठी पेगवर पेग भरू लागला. पण त्याने एक दिवस निर्णय घेतला की, आता तो बॉडी बिल्डिंग करणार. त्याने त्यानंतर कधी मागे वळून पाहिले नाही.

View this post on Instagram

・ 「生まれ変わるなら、生きてるうちに」 GGの須江正尋選手のサイン色紙に添えられてた言葉。 長渕剛「人生はラララ」の 歌詞の一部でした😊 ・ もしも人生がやり直せるのなら♪ 誰も人生を悔やみはしない だけど人生は一度きりだから♪ 生まれ変わるなら生きてるうちに ・ 人生楽しみましょうね〜〜 まだまだこれからっす‼️ ・ さていよいよ明日はBBJ新潟大会 必ずや🇯🇵 ・ ってなわけで今日はゆっくり 映画「ダンケルク」からの トレーニングバトル「THE TOP」観戦 ・ #妹尾さんありがとうございます #ダンケルク #BBJ #ベストボディジャパン #人生はラララ #生まれ変わるなら生きてるうちに #長渕剛 #良い言葉

A post shared by しらぴょん (@shirapyong66) on


शिराप्योनने एका मुलाखतीत सांगितले की, १२ किलो वजन मी कमी केले. मी ज्यासाठी तासनतास जिम गाळला आणि हेल्दी डाएट फॉलो केली. पहिल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मी यशस्वी ठरू शकलो नाही. पण मी हार मानली नाही. अनेक आव्हानांचा मी स्विकार केला आणि स्वत:ला आणखी मजबूत केले. आता हे करत असताना मला चार वर्ष झाली आहेत.


शिराप्योन सांगतो की, माझ्या जीवनात ज्या कारणामुळे हा बदल झाला आहे. मी त्याने आनंदी आहे. जीवनात जर काही करायचे असेल तर याच जीवनात करा. शिराप्योनच्या मेहनतीमुळे त्याचे जीवन आता फार सुंदर झाले आहे. त्याला नवीन लाइफ पार्टनर आता मिळाली आहे. ती एक बिकीनी फिटनेस मॉडल आहे. दोघेही आनंदी आहेत. यावर तो म्हणतो की, मी माझे शरीर बदलले आणि माझं नशीबच बदलून गेले.


शिराप्योनचे असे मत आहे की, तुमचे जीवन बॉडी बिल्डिंगमुळे बदलेल असे नाही कारण बॉडी बिल्डिंग नाही तर इच्छाशक्ती काहीतरी मिळवण्यासाठी गरजेची आहे आणि त्यासाठी आवड देखील महत्त्वाची आहे. त्यामुळेच तुम्ही पुढे पुढे जाल.

Leave a Comment