लॅपटॉपला चार्ज करणारी जगातील पहिली पॉवर बँक लाँच


मुंबई : सध्याच्या डिजीटल युगात दरदिवशी कोणती ना कोणती गोष्ट लाँच होत असते. त्यातच आपल्या हातात स्मार्टफोन असल्यामुळे प्ले स्टोअरच्या माध्यमातून नवनवीन अपडेट येतच असतात. यात कधी कधी स्मार्टफोनचा कॅमेरा अपग्रेड होतो तर कधी डिस्प्ले आणि प्रोसेसरमध्ये बदल होतात. स्मार्टफोनला टेक्नोलॉजीच्या मदतीने नेहमी अधिक सुविधाजनक बनवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. स्मार्टफोनच्या तुलनेत त्याच्या बॅटरीच्या क्षमतेवर फार थोडे काम केलेले दिसते. स्मार्टफोनमधील बॅटरी या आजही जास्तीतजास्त 3500mAh ते 5000mAh क्षमतेच्या असतात. त्यामुळे मोबाईल चार्ज करण्यासाठी पावर बँक नेहमी सोबत ठेवावीच लागते.

आपल्या फोनमधील इंटरनेट कायम स्वरुपी चालु असल्यास आपल्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर उतरते. या समस्येवर उपाय म्हणून हायपर या कंपनीने एक नवीन आणि अॅडव्हान्स पावर बँक आणली आहे. हायपरज्युस (HyperJuice) असे या नवीन पावर बँकचे नाव आहे. 130W चे पावर आऊटपूट या पावर बँकमध्ये देण्यात आले आहे. यामध्ये 2 युएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आल्यामुळे एकाचवेळी दोन डिव्हाईस चार्ज करता येतील.

स्मार्टफोनच नाही तर Apple MacBook आणि MacBook Pro यांसारखे युएसबी टाईप-सी पावर्ड लॅपटॉपही या पावर बँकने चार्ज होऊ शकतात. एका स्टॅन्डर्ड युएसबी पोर्टसोबत हे येते, 18W आऊटपूटला हे सपोर्ट करते. या पावर बँकची बॅटरी क्षमता 27,000mAh आहे. Apple MacBook Pro याने फुल चार्ज करता येईल असा दावा कंपनीने केला आहे.

हायपरज्युस पावर बँक 100W इटनपूटला सपोर्ट करते. याच्या येणाऱ्या 112W पावर अडॉप्टरने एका तासात एक डिव्हाईस फुल चार्ज करता येईल, असा दावा हायपर कंपनीने केला आहे. सिल्व्हर आणि डीप ग्रे रंगात ही पावर बँक उपलब्ध आहे. याची किंमत 1728 युआन म्हणजेच जवळपास 17,437 रुपये एवढी आहे. ही पावर बँक तुम्हा हायपर कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन विकत घेता येऊ शकते.

Leave a Comment