विश्वचषकासाठी रवाना होण्याआधी पबजी खेळण्यात मग्न धोनी


आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडिया इंग्लंडसाठी रवाना झाली आहे. टीम इंडियाच्या सदस्यांनी मुंबई विमानतळावरुन इंग्लंडसाठी उड्डाण केले. 30 मेपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. विमानतळावर टीम इंडियातील खुप रिलॅक्स मुडमध्ये दिसून आले.

काही खेळाडू विश्रांती घेत होते तर काहीजण आपल्या मोबाईलमध्ये गुंतलले होते. इंग्लंडसाठी रवाना होण्याची आधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी मोबाइलवर पबजी गेम खेळला. सध्या सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. एका फोटोत महेंद्र सिंह धोनी आणि युजवेंद्र चहल एकत्र पबजी खेळताना दिसत आहेत.

टीम इंडियाच्या इंस्टाग्रामवरील अधिकृत पेजवर काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्याफोटोंवर काही लोक विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाला शुभेच्छा देत आहेत, तर काहीजण पबजी सोडून क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देत आहेत. एक वापरकर्ता म्हणाला – मोबाइल फोन सोडा आणि क्रिकेटवर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करा. यावेळी आम्हाला विश्वचषकाची आवश्यकता आहे.

Leave a Comment