
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचा शिवसेना प्रवेश मोठा धक्का मानला जात आहे.
घड्याळ काढून हातावर शिवबंधन बांधणार जयदत्त क्षीरसागर
क्षीरसागर हे गेल्या अनेक दिवसांपासून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे बीडमधील नेते धनंजय मुंडे यांच्यावर नाराज असल्यामुळेच लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला मदत करण्याची जाहीर भूमिका घेतली होती. ते त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपमध्ये जातील, असा कयास लावला जात होता. मात्र, आता ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
