
बी टाऊन कधी काय होईल याचा नेम नाही. कधी कुणाचे ब्रेकअप होते तर कधी कुणाचे सुत जुळते. आता त्यातच बी टाऊनमधील आणखी एक सेलिब्रेटी जोडपे घटस्फोट घेण्याच्या मार्गावर असून ‘जाने तू या जाने ना’ यासारख्या चित्रपटात झळकलेला प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान घटस्फोट घेणार असल्याची माहिती आहे. इम्रान आठ वर्षांच्या संसारानंतर पत्नी अवंतिका मलिकपासून विभक्त होणार असल्याचे म्हटले जात आहे.
बी टाऊनमधील आणखी एक सेलिब्रेटी जोडपे घटस्फोटाच्या मार्गावर
आम्ही आमच्या नात्याला दोघांमधील तीव्र मतभेदामुळे विराम देण्याचा निर्णय घेतला आहे, असे अवंतिकाने सांगितल्याचे ‘डीएनए’ वृत्तपत्रातील रिपोर्टमध्ये म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच मुलगी इमारासोबत अवंतिकाने इम्रानचे ‘पाली हिल’मधील घर सोडले. ती सध्या माहेरी राहत असल्याची माहिती आहे. परंतु घटस्फोटाच्या वृत्ताला दोघांनीही अद्याप दुजोरा दिलेला नाही.
वयाच्या 19 व्या वर्षी इम्रान आणि अवंतिका यांची भेट झाली होती. काही वर्ष डेटिंग केल्यानंतर दोघे लॉस अँजिलसमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. ते दहा वर्षांच्या ओळखीनंतर 2011 मध्ये विवाहबंधनात अडकले. 2014 त्यांच्या मुलीचा जन्म झाला. तिचे नामकरण इमारा मलिक खान असे करण्यात आले.
