कारला ४५ डिग्री तापमानापासून वाचण्यासाठी महिलेने चक्क शेणाने सारवले


सध्याच्या घडीला देशातील प्रत्येकजण कडक उन्हामुळे त्रासलेले असून आपल्यातील बहुतेकजण त्यापासून वाचण्यासाठी एसी, कूलर, फॅनचा वापर करतात. पण, गुजरातमधील अहमदाबादच्या एका महिलेने या रखरखत्या उन्हापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. आपल्या संपूर्ण कारला त्या महिलेने चक्क शेणाने सारवले आहे. या कारचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा फोटो फेसबुकवर रूपेश दास नावाच्या एका व्यक्तीने पोस्ट केला आहे. त्यासोबत तो कॅप्शनमध्ये म्हणतो की, मी अहमदाबादमध्ये शेणाचा सर्वात चांगला वापर पाहिला असून ४५ डिग्री तापमानापासून कारला वाचण्यासाठी सेजल शाह या महिलेने चक्क शेणाने सारवले आहे.व्हायरल झालेल्या फोटोमध्ये मुंबईमधील या कारची पासिंग असल्याचे दिसते. गाडीचा क्रमांक एम.एच ०१, एआय ६२६७ असा आहे.

फेसबुकवर रूपेश दासने कारचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. शेणाचा वापर ग्रामीण भागांमध्ये घरापुढे सडा टाकण्यासाठी किंवा सारवण्यासाठी केला जातो. पण, चक्क कारला सेजल शाह या महिलेने शेणाने सावरले आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *