‘कोण होणार करोडपती’चे ‘अँग्रीया’ क्रूझवर ग्रँड लॉन्चिंग


लवकरच सोनी मराठीवर ‘कोण होणार करोडपती’ या रिआलिटी शो दाखल होणार आहे. नुकतीच अँग्रीया क्रूझ शिपवर याच गेम शो ची पत्रकार परिषद पार पडली. या कार्यक्रमाच सूत्रसंचालन करणाऱ्या नागराज मंजुळेने ग्रँड एन्ट्री घेत क्रूझला फ्लॅग दाखवून या शोच्या अनोख्या सफरीला सुरुवात केली.

आपल्या ‘झुंड’ या चित्रपटाचे शुटिंग करत असतानाच नागराज मंजुळे हे सोनीच्या टीमकडून त्यांना हा शो होस्ट करण्याची ऑफर देण्यात आली. त्यांनी त्यावेळी अवघ्या पाचच मिनिटात विचार करून हा शो होस्ट करायला होकार दिला. सर्वसामान्य माणसातील गुण हेरून त्याला स्टारपदी नेण्याची ताकद नागराज यांच्यात असल्याने त्याची या शोच सूत्रसंचालन करण्यासाठी निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दुसरीकडे नागराज यांना या शोला होकार दिल्यानंतर त्याच्या व्यक्तिमत्वात अनेक बदल करावे लागले. त्यांना त्यासाठी उन्हात जाण्यापासून मज्जाव करण्यापासून ते आयुष्यात पहिल्यांदाच ‘स्पा आणि सलून’ची पायरी चढून नवीन हेअरकट मेडीक्यूर, पेडीक्यूर करावे लागले. त्यानंतर अनेक दिवस या शोसाठी खास तयारी करावी लागली. पण हे सगळेच पहिल्यादा करत असल्याने आपण एन्जॉय केल्याचे त्यांनी म्हटले आहे. श्रीरंग गोडबोले यांनी या रिआलिटी शोसाठी तयार केलेले एक खास गाणे लिहिले असून, त्याला ए व्ही प्रफुलचंद्र यांनी संगीत दिले आहे. हे गाणे स्वतः नागराज मुंजळेंनी गायले आहे.

या शोमध्ये यंदा नेहमीप्रमाणेच फिफ्टी फिफ्टी, लोकांचे जनमत, आणि एक्स्पर्टची मदत आशा तीन लाईफलाइन असतील. पण यंदा साडेतीन लाख रुपये जिंकल्यानंतर ते कसे गुंतवावे याचे मार्गदर्शन करणाऱ्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला चॅनल कडून स्पर्धकाला मोफत देण्यात येणार आहे. पण त्यांच्या वापर करायचा अथवा नाही हे सर्वस्वी स्पर्धकाच्या इच्छेवर अवलंबून असेल.

Leave a Comment