भारतात रिलीज होणार धनुषचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट


सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई अर्थात अभिनेता धनुष याचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट भारतात रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे नाव ‘द एक्स्ट्राऑर्डीनरी जर्नी ऑफ फकीर’ असे आहे. तमिळ भाषेत हा चित्रपट रिलीज होणार आहे. या तमिळ चित्रपटाचे नाव ‘पाक्कीरी’ असे आहे. नुकताच याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.


या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘केन स्कॉट’ यांनी केले असून भारतात हा चित्रपट २१ जुन २०१९ रोजी रिलीज होणार आहे. धनुषने ‘द एक्स्ट्राऑर्डीनरी जर्नी ऑफ फकीर’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात बर्नीस बेजो, बेन मिलर, एरीन मोरीआर्टी, आणि अबील जाफरी हे कलाकार धनुषसोबत पाहायला मिळणार आहेत.

Leave a Comment