व्हॉट्सअॅपवरील फॉरवर्ड मॅसेजवर विश्वास ठेवण्याआधी अशी करा पडताळणी


कोणत्याही प्रकारचा मॅसेज सोशल मीडियावरून व्हायरल व्हायला काही क्षणच लागतात. पण आपल्यापैकी कित्येकजण व्हायरल मॅसेजची सत्यता न पडताळता तुमची वैयक्तिक माहिती उघड केल्यास तुमच्या खिशाला आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पण व्हॉट्सअॅप सारख्या माध्यमातून सध्याच्या घडीला ‘अमुक लिंक वर क्लिक करा आणि फायदा मिळवा’ असे मॅसेज सर्रास फॉरवर्ड केले जातात. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये विजयी झालेल्या मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी सेलिब्रेट करण्यासाठी जिओ या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीतर्फे ग्राहकांना 399 रुपये किंमतीचा तीन महिन्यांचा रिचार्ज व टीमचा टीशर्ट मोफत मिळणार आहे अशा संदर्भातील एक मॅसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पण जिओ तर्फे या मॅसेजमधील स्कीमची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात न आल्यामुळे यातील खोट्या लिंक्स वर क्लिक करून आपली माहिती लोकांनी देऊ नये असे आवाहन करणारे एक सूचना पत्रक पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहे. सुरवातीला व्हायरल मॅसेजमध्ये तुम्हाला एका लिंक वर क्लिक करून स्वतःची वैयक्तिक माहिती भरून मागितली जाते. ज्यात तुमचे नाव आणि मोबाईल क्रमांक टाकल्यावर मुंबई इंडियन्स संघाचा बॅनर असलेले एक वेगळे पेज ओपन होते. तुम्हाला या पेजवरून हा मॅसेज संपर्कांतील दहा नंबर वर पाठवायला सांगितले जाते. शिवाय जिओ तुमच्याकडे नसल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना याचा फायदा होऊ शकतो म्हणून या मेसेजला फॉरवर्ड करा असे सांगणारा एक ब्लॉगस्पॉट देखील जोडलेला आहे. पण हॅकर्सकडून ही लिंक बनवण्यात आलेली गूगलची फ्री वेबसाईट असू शकते त्यामुळे हा मॅसेज फेक असून यावर विश्वास ठेवू नये,असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

व्हायरल मॅसेजमधील फ्रॉड ओळखण्यासाठी कोणत्याही वेबसाईटच्या लिंक वर क्लिक करण्याआधी त्यातील HTTP आणि HTTPS उपसर्ग तपासून पाहा. पर्सनल माहिती कोणत्याही साईटवर भरू नका, ही माहिती इतर कंपन्यांना विकली जाऊ शकते. सुरवातीला कॉपीराईट किंवा अधिकृत साईट्स चेक करा. कंपनीचे नाव, माहिती, स्पेलिंग मधील चुका, इतर लिंक तपासून घ्या. हा फ्रॉड खोट्या कॉल्स मधून ही होऊ शकतो त्यामुळे नंबर ओळखणाऱ्या अॅप्सचा वापर करा.

Leave a Comment