कार्यकर्त्यांनी फक्त मतमोजणी केंद्रावर नजर ठेवावी – प्रियंका गांधी


नवी दिल्ली – रविवारी लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर विविध माध्यमांनी आपआपले एक्झिट पोल जाहिर केले. ज्यात भाजप-प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहेत. यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी एक्झिट पोल आणि अफवांकडे लक्ष देऊ नये, असा सल्ला दिला आहे. प्रियंका यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून एक्झिट पोल्समधून जाहीर करण्यात आलेल्या निकालांमुळे चिंता करत न बसता मतमोजणी केंद्रावर नजर ठेवावी, असे म्हटले आहे.

यासंर्दभातील एक ऑडियो संदेश प्रियंका गांधींनी जारी केला आहे. त्यांनी या ऑडिओमध्ये अफवांवर आणि एक्झिट पोलवर विश्वास ठेवून हिंमत हरू नका. तुमचे मनोबल खच्ची करण्यासाठीच या अफवा पसरवल्या जात आहेत. आपण अशा वेळेस सावध राहणे अधिकच आवश्यक ठरते. स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्रांवर नजर ठेवा आणि सावध रहा, असे म्हटले आहे. आमच्या आणि तुमच्या मेहनतीला यश मिळणार, अशी आम्हाला आशा असल्याचे त्या पुढे म्हणाल्या.

Leave a Comment