भिलवाड्यातील ३२ टनाचे इंजिन आता बनले आहे सेल्फी पॉइंट


भिलवाडा – ३२ टन वजनाचे एक रेल्वे इंजिन राजस्थानातील भिलवाडा येथे एका भंगारवाल्याने १२ लाख रुपयांत विकत घेतले होते. टिळकनगर भागात नेऊन त्याने ते ठेवले. हेच इंजिन आता शहरातील नवे सेल्फी पॉइंट ठरले आहे. या परिसरातील मुले आता येथे खेळण्यास येतात.

विक्रम सिमेंटच्या कारखान्यातून भंगारवाले अंबालाल खोईवाल यांनी ते इंजिन विकत घेतले आहे. आदित्य बिर्ला ग्रुपची नीमचजवळ खोर येथील सिमेंट कारखान्यापासून रेल्वेस्थानकापर्यंत रेल्वेलाइन आहे. कारखान्यातून सामान वाहतूक करणाऱ्या रेल्वेनेच होते. कंपनीने ते जुने झाल्याने त्याचा लिलाव केला. खोईवाल यांनी सांगितले, हे डिझेल इंजिन असून ५० हजार टन वजन वाहून नेण्याची याची क्षमता आहे.

Leave a Comment