भारतीय संघ 1992मध्ये पहिल्यांदाच रंगीत जर्सी घालून उतरला होता मैदानात


काही महिन्यांआधी भारतीय संघांची नवीन जर्सी कोणती असेल, याबाबत भारतीय क्रिकेट बोर्डाने खुलासा केला असल्यामुळे हीच जर्सी परिधान करुन विराट सेना विश्वचषकात उतरेल. दरम्यान 1983साली भारताला पहिला विश्वचषक मिळवून देणारा कपिल देव यांच्या संघाने सफेद जर्सी परिधान केली होती. दरम्यान सर्व संघांनी 1992मध्ये पहिल्यांदाच रंगीत जर्सी परिधान केली.

भारतीय संघ पहिल्यांदाच 30 मेपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. दरम्यान, काही बदलाव या विश्वचषकात करण्यात आले आहेत. या जर्सीची कॉलर नारंगी रंगावरुन निळ्या रंगाची करण्यात आली आहे. तसेच या कॉलरवर 1983 चा विश्वचषक विजय, 2007चा टी-20 विश्वचषक विजय आणि 2011 विश्वचषक विजय यांची नोंद करण्यात आली आहे.

2015 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने निळ्या रंगाची जर्सी परिधान केली होती. या जर्सीची विशेषत: म्हणजे ही जर्सी प्लास्टिकच्या बाटल्यांपासून तयार करण्यात आली होती.

भारताने तब्बल 28 वर्षांनी 2011मध्ये विजेतेपद पटकावले होते. दरम्यान भारतीय संघाच्या जर्सीचा रंग त्यावेळीही निळाच होता. दरम्यान या जर्सीवर नारंगी रंगाने देशाचे नाव लिहिले होते.

एखाद्या वाईट स्वप्नसारखा 2007चा विश्वचषक भारताकरिता होता. भारतीय संघाने त्यावेळी आकाशी रंगाची जर्सी परिधान केली होती. पण ही जर्सी भारतीय संघासाठी यशस्वी ठरली नाही.

गांगुलीच्या एका चूकीमुळे 2003च्या विश्वचषकात भारतीय संघाला अंतिम फेरीत पराभव स्विकारावा लागला. अंतिम फेरीत पराभव मिळाल्यामुळे भारताचे विश्वविजेता बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. दरम्यान भारताने त्यावेळीही आकाशी रंगाची जर्सी परिधान केली होती. दरम्यान तिरंगी रंगात भारतीय संघाचे नाव लिहिले गेले होते.

भारतीय संघाने 1999च्या विश्वचषकात हलक्या आकाशी रंगाची जर्सी परिधान केली होती. या जर्सीची कॉलर पिवळ्या रंगाची होती. या जर्सीवर मात्र देशाचे नाव लिहिले नव्हते,

भारताला 1996च्या विश्वचषकात अंतिम फेरीत श्रीलंकेविरोधात सामना गमवावा लागला होता. यावेळी जर्सीची कॉलर आणि बाजू पिवळ्या रंगाची होती.

दरम्यान 1992मध्ये भारतीय संघ पहिल्यांदा रंगीत जर्सीत उतरला. सर्व संघांनी या सामन्यात पहिल्यांदा रंगीत जर्सी परिधान केली होती. या जर्सीच्या मागे प्रत्येक खेळाडूचे नाव लिहिण्यात आले होते.

Leave a Comment