अमेरिकेच्या विद्यार्थ्याने कागदाचे विमान 56 मीटर उडवून जिंकली पेपर प्लेन वर्ल्ड चॅम्पियनशिप


व्हिएना (ऑस्ट्रिया)- कागदाच्या विमान उडवण्याची विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रिया आयोजित करण्यात आली होती. भारतासमवेत 61 देशातील 380 यूनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. तीन श्रेणीमध्ये झालेल्या स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी स्वतः कागदाचे विमान बनवून उडवले.

अमेरिकेच्या जॅक हार्डी या विद्यार्थ्याने ही स्पर्धा जिंकली. त्याने बनवलेल्या विमानाने तब्बल 56.61 मीटरची लांबी गाठली. तसेच सर्बियाचा लेजर दूसरा आणि स्लोवेनियाचा रॉबर्ट तिसरा क्रमांक पटकावला. लेजरचे विमानाने 52.28 मीटर आणि रॉबर्टच्या विमानाने 46.36 मीटर एवढी लांबी गाठली. या स्पर्धेची सुरुवात 2006 मध्ये ऑस्ट्रियाई कंपनी रेडबूलने केली होती.

स्पर्धकांना वर्ल्ड चॅंपिअनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी आपले कीट घेऊन यावे लागते. त्यानंतर त्यांना आयोजक चांगल्या क्वालिटीचा ए-4 साइज पेपर देतात. त्या पेपरचे स्पर्धकांना विमान तयार करावे लागते. यासाठी सहभागी स्पर्धकांना आपल्या किटमध्ये कात्री, चिकटटेप, डिझाइन करण्याचे सर्व सामान आणि डिंक आणू शकतात. कोणतीही डिझाइन असलेले विमान या स्पर्धेअंतर्गत उडवण्याची परवानगी दिली जाते. स्पर्धक यादरम्यान आपले विमान पाहिजे त्या पद्धतीने उडवू शकतात. जसे की, पळत जाऊन, एखाद्या प्रॉपच्या मदतीने किंवा आपल्याकडे असलेल्या कौशल्याने विमान उडवून फक्त ते जास्तीत-जास्त लांब उडवायचे असते. या वर्षी जॅकने 56.61 मीटरची लांबी गाठुन विजेतेपद पटकावले.

Leave a Comment