असा आहे ‘लाल कप्तान’मधील सैफचा लूक


काही दिवसांपूर्वीच ‘बाजार’ चित्रपटातून अभिनेता सैफ अली खान प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण बॉक्स ऑफिसवर त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा असा प्रतिसाद लाभला नाही. त्यातच आता पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यास सैफ सज्ज झाला असून ‘लाल कप्तान’ चित्रपटातून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सैफचा लूक यात पाहायला मिळत असून त्याचा हा आगळावेगळा अवतार प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचवणारा आहे. नवदीप सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती आनंद एल. राय करणार आहेत. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरसोबतच याची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या ६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment