अनुपम खेर यांच्या ‘वन डे’चा ट्रेलर रिलीज


पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे सज्ज झाले असून ते आगामी ‘वन डे’ या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. काल या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज केल्यानंतर नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये अनुपम खेर यांच्यासोबतच ईशा गुप्ता आणि कुमूद मिश्रा यांचेही लूक पाहायला मिळत आहेत.

आज दुपारी १ वाजता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अशोक नंदा यांनी केले आहे. येत्या १४ जूनला अनुपम खेर यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आले होते. या पोस्टरवर ‘जस्टीस डिलिव्हर्ड’, प्रत्येक गुन्ह्यामागे एक कथा दडलेली असते, अशी टॅगलाईन देण्यात आली होती. दरम्यान, अनुपम खेर हे या चित्रपटात वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. केतन पटेल आणि स्वाती सिंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.