सोशल मीडियात रंगली देसी गर्लच्या गरोदरपणाची चर्चा


अमेरिकन गायक निक जोनास याच्याशी बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राने गतवर्षी लगीनगाठ बांधली. त्यांचा शाही विवाहसोहळा जोधपूरच्या उमेद भवनमध्ये पार पडला होता. दोघे सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतात. त्यांचे त्यांच्या लग्नानंतर बरेचसे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता चर्चा प्रियंका लवकरच आई होणार असल्याची रंगली आहे. होय, ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर प्रियंकाच्या काही फोटोंमुळे रंगल्या आहेत.

View this post on Instagram

Cannes 2019 @red #5BFilm

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on


अलिकडेच ‘मेट गाला’ आणि ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये प्रियंका आणि निकने चाहत्यांचे लक्ष वेधले. पण तिचा यावेळी लूक पाहून सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. तिच्या कान्समधील लूकने या चर्चांना हवा देण्याचे काम केले. जो ड्रेस प्रियंकाने घातला होता तिचे ‘बेबी बम्प’ त्यामध्ये समोर आल्याचे दिसले. यावरून ती प्रेग्नंट आहे का? असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जाऊ लागले. यातच ऑस्कर विजेती ओक्टाव्हिया स्पेन्सर हिच्या एका कमेंटने तर या चर्चा अधिकच रंगल्या आहेत.

अमेरिकन अभिनेत्री ओक्टाव्हिया स्पेन्सर आणि प्रियंका चोप्रा या दोघीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहेत. ‘कान्स’मधील तिचा एक फोटो प्रियंकाने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिच्या पोस्टवर ओक्टाव्हियाने ‘स्टनिंग ममासिटा’, अशी कमेंट दिली आहे. ‘हॉट ममा’ असा याचा अर्थ होतो. प्रियंका प्रेग्नंट असल्याचा अंदाज यावरून सोशल मीडियावर लावला जात आहे. अद्याप प्रेग्नंसीबाबत प्रियंका आणि निकने कोणतीही घोषणा केली नाही. पण, या बातमीला ओक्टाव्हियाच्या या कमेंटने दुजोरा दिला आहे.

Leave a Comment