एक्झिट पोल्सने दिलेला ‘कल’ निकाल म्हणून पाहता येणार नाही – व्यंकय्या नायडू


अमरावती – १९९९ पासून एक्झिट पोल्सनी वर्तवलेले भाकीत चुकीचे ठरत असून २३ मे रोजी जाहीर होणारे निकाल यापेक्षाही वेगळे असू शकतात. त्यामुळे निकाल म्हणून एक्झिट पोल्सने दिलेला ‘कल’ पाहता येणार नाही. प्रत्यक्षात खरे निकाल वेगळे असू शकतात, अशी शक्यता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे.

नायडू यांनी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे एका अनौपचारिक बैठकीला संबोधित केले. एक्झिट पोलचे निकाल जाहीर होताच सर्वांनी यावेळी नायडूंचे अभिनंदन करत भाजप सत्तेत येईल, अशी आशा व्यक्त केली. पण नायडूंनी एक्झिट पोलच्या निकालाविषयी अत्यंत सावध भूमिका घेतली. आपणच जिंकू अशी आशा प्रत्येक पक्षाला वाटत असते. प्रत्येक पक्ष निकाल जाहीर होईपर्यंत आपणच जिंकू असा आत्मविश्वासही व्यक्त करत असतो. पण या विश्वासाला काहीच आधार नसल्यामुळे खरा निकाल एक्झिट पोल्सप्रमाणेच लागेल असे गृहीत धरणे चुकीचे ठरेल, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment