आता तुमच्या स्मार्टफोनमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बूक


नवी दिल्ली : नेहमीच आपल्या वाहनाची कायदेशीर कागदपत्रे वाहन चालक प्रवासादरम्यान विसरतात. त्यामुळे तपासणी करताना ड्रायव्हिंग लायसन्स सादर न करु शकल्याने वाहतूक पोलीस दंडही आकारतात. अनेकदा वाहनाशी संबंधित कागदपत्रे सोबत बाळगणे जोखमीचेही असते. सरकारने यावर उपाय म्हणून ‘mParivahan’ हे अधिकृत अॅप तयार केले आहे.

वाहनचालक ‘mParivahan’ या अॅपच्या मदतीने आपले नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आणि ड्रायव्हिंग लायसन्ससारखी कागदपत्रे स्मार्टफोनमध्ये डिजिटल स्वरुपात ठेऊ शकतात. अँड्रॉईड (Android) आणि आयओएस (iOS) दोन्ही ऑपरेटींग सिस्टमसाठी हे अॅप उपलब्ध आहे. हे अॅप प्ले स्टोअरवरुन डाउनलोड करता येईल. त्यानंतर अॅपमध्ये नोंदणी करणेही आवश्यक आहे.

मुळ कागदपत्रांप्रमाणेच ‘mParivahan’ या अॅपवरील डिजीटल कागदपत्रेदेखील वैध मानली जातील. स्वतंत्रपणे त्यांची वैधताही तपासता येईल. कागदपत्रांची मागणी वाहतूक पोलिसांनी केल्यास त्यांना तुम्ही स्मार्टफोनवरील वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) दाखवू शकता. या अॅपच्या मदतीने डिजीटल लायसन्स डाऊनलोड करण्यासाठी गाडीचा नोंदणी क्रमांक आणि मुळ ड्रायव्हिंग लायसन्स होणे आवश्यक आहे. तसेच जन्म दिनांकही सांगावा लागेल.

‘mParivahan’ अॅपवर डिजीटल आरसी डाऊनलोडसाठी ‘mParivahaan’ अॅप उघडा. टॉप राईट कॉर्नरवर क्लिक करा. तेथे Sign in ऑप्शनवर क्लिक करा आणि आपला मोबाईल क्रमांक टाका. मोबाईलवर एसएमएसने आलेला व्हेरिफिकेशन कोड टाका. आता अॅपच्या होमस्क्रीनवर जाऊन RC वर क्लिक करा. सर्च टॅबमध्ये गाडीचा नोंदणी क्रमांक टाका आणि सर्च करा.अॅप रजिस्ट्रेशन क्रमांकाशी जोडलेली माहिती ऑटोमॅटीकली दिसेल. ‘Add to dashboard’ वर क्लिक करा आणि RC समाविष्ट करा.

Leave a Comment