
चीनी मोबाईल कंपनी हुवाईला आपले अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम वापरण्यापासून गुगलने रोख लावली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या नवीन निर्देशांचे पालन करण्याच्या दृष्टीने गुगलने हे पाऊल उचचले आहे. आता हुवाईच्या नवीन स्मार्टफोन्समध्ये ह्या महत्त्वपुर्ण निर्णयामुळे लोकप्रिय असलेले गुगल अॅप्ससुद्धा दिसणार नाही. हुवाई कंपनीला गुगलच्या ह्या निर्णयामुळे मोठा झटका बसला आहे. हुवाई स्मार्टफोन्सच्या विक्रीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
गुगलच्या ह्या निर्णयामुळे हुवाई कंपनीला मोठा झटका
हुवाई कंपनीला ट्रम्प प्रशासनाने त्या कंपनीच्या यादीत समाविष्ट केले ज्यांच्यासोबत अमेरिकन कंपन्या तोपर्यंत व्यापार करु शकणार नाही, त्यांच्याजवळ जोपर्यंत अधिकृत परवाना येत नाही. त्यामुळे त्यांच्या आदेशाचे पालन करुन हुवाईला अँड्रॉईड अपडेट देण्यापासून गुगलने रोख लावली आहे.
दोन महिन्यांआधी हुवाईचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड यांनी असे स्पष्ट केले होते की, जर त्यांची अँड्रॉईड सुविधा देण्यास गुगल नकार देत असेल, तर आमची कंपनी स्वत: चे असे एक ओएस बनवेल. गुगलच्या ह्या महत्त्वपुर्ण निर्णयानंतर हुवाईचे अँड्रॉईड परवाना रद्द झाला आहे. त्यामुळे आता ह्या डिवाइसेसवर अँड्रॉईड अपडेट्स येणार नाही. तसेच हुवाईच्या कोणत्याही डिवाईसवर आता युट्यूब आणि मॅप्स सारखे अॅप्सदेखील मिळणार नाही.
