विश्वचषकानंतर फिल सिमंस सोडणार अफगाणिस्तानचे प्रशिक्षक पद


नवी दिल्ली – फिल सिमंस हे विश्वचषक स्पर्धेनंतर अफगाणिस्तानचे प्रशिक्षक प्रशिक्षक पद सोडणार आहेत. विश्वचषकानंतर विंडीज माजी अष्टपैलू खेळाडू सिमंस यांचा १८ महिन्यांचा करार संपणार असून ते पुढे करार वाढवू इच्छित नाहीत.

याबाबत बोलताना सिमंस म्हणाले की, मी प्रशिक्षक पद सोडण्याचा विचार केला असून बोर्डाला यासंबंधी नोटीस दिली आहे. माझा करार १५ जुलैला संपणार आहे. १८ महिने हे काम सांभाळले आहे. खूप काही यादरम्यान घडले. आता वेगळे काही तरी काम करायचे आहे. अफगाणिस्तानला विश्वचषक स्पर्धेत जागा निश्वित करण्यासाठी माझी निवड झाली होती.

बोर्डाने गुलबदन नायब याला संघाचा कर्णधार करण्यावर माझ्याशी कोणतीच चर्चा केली नसल्याचे सिमंस यांनी सांगितले. कर्णधार बदलणे हे माझे काम नाही मी केवळ नाव सुचवू शकतो. अफगाणिस्तानचा संघ यंदाच्या विश्वचषकात सहभागी होत आहे. सिंमस यांनी ही उल्लेखनीय बाब असल्याचे म्हटले. १ जून रोजी बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी अफगाणिस्तानचा पहिला सामना होणार आहे.

Leave a Comment