वेस्ट इंडिजने ‘या’ अष्टपैलू खेळाडूंना ठेवले स्टँडबायवर


बार्बाडोस – अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेल्या वेस्ट इंडिज संघाच्या इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीवर साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. १५ सदस्सीय संघाची या स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजने घोषणाही केली आहे. सुरुवातीला यामध्ये कायरन पोलार्ड आणि ड्वेन ब्राव्हो यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. पण या दोघांना निवड समितीने राखीव १० खेळाडूंमध्ये स्थान दिले आहे.

वेस्ट इंडिज संघातील १५ सदस्यांपैकी कोणत्याही एका खेळाडूला दुखापत झाल्यास या राखीव १० खेळाडूंमधील एकाला विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळू शकते. सुनील अंब्रोस, ड्वेन ब्रावो, जॉन कॅम्पबेल, जोनाथन कार्टर, रोस्टन चेज, शेन डाउरिच, कीमो पॉल, कॅरी पियरे, रेमोन रिफर, कायरन पोलार्ड यांचा या १० खेळाडूंमध्ये समावेश आहे.

सुरुवातीला संघात ड्वेन ब्राव्हो आणि कायरन पोलार्ड यांसारख्या दिग्गज अष्टपैलू खेळाडूंना स्थान न दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. संघासाठी दोघेही उपयुक्त कामगिरी बजावू शकतात. १० जणांच्या या राखीव खेळाडूंमध्ये सुनील अंब्रोस यालाही संधी दिली आहे. नुकत्याच झालेल्या तिंरगी मालिकेतील ४ सामन्यात सुनिलने अनुक्रमे नाबाद ६९, २३, १२८ आणि ३८ धावांची खेळी करत छाप सोडली आहे. १९ मे रोजी इंग्लंडच्या साउथम्पटन येथे वेस्ट इंडिज संघाचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे.

Leave a Comment