बीसीसीआयचा भारतीय खेळाडूंना आराम करण्याचा सल्ला


या महिन्याच्या 30 तारखेपासून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत असून या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने भारतीय संघाच्या खेळाडूंना सराव करण्यापेक्षा आराम करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच आयपीएलचा मोसम संपला असून भारतीय खेळाडूंसह अन्य देशातील खेळाडूंची यात बरीच धावपळ झाली. खेळाडूंना अधिक सरावातून दुखापत होऊ नये, यासाठी हा सल्ला दिला आहे.

भारतीय संघाचे वेळापत्रक गतवर्षात अधिक व्यस्त होते. खेळाडूंना सातत्याने क्रिकेट खेळण्यामुळे विश्रांतीची संधी मिळाली नाही. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी खेळाडूंना आपल्या परिवारासोबत वेळ घालवावा, फिरायला जावे आणि २१ मे रोजी मुंबईत सकारात्मक मन आणि विचाराने परत यावे, असा संदेश बीसीसीआयने खेळाडूंना दिला आहे. बीसीसीआयने असा सल्ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी दिला आहे.

कर्णधार विराट कोहली सध्या सुट्टी घेऊन गोवा दौऱ्यावर गेला असून तो पत्नी आणि मित्रासोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. दुसरीकडे उप-कर्णधार रोहित शर्माही आपली पत्नी आणि मुलीसह मालदीवला गेला आहे तर फिरकीपटू युजवेंद्र चहल गोव्याला गेला आहे. विश्वचषकात भारताचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

Leave a Comment