सोशल मीडियावर देखील विराट कोहलीचाच बोलबाला


भारतीयांमध्ये क्रिकेट या खेळाची क्रेझ काय आहे हे तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. भारतीय संघातील स्टार क्रिकेटपटू हे लोकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत असे म्हटले तर वावगे ठरु नये. राजकीय नेते आणि बॉलीवूड सेलिब्रेटींप्रमाणे सोशल मीडियावर क्रिकेटपटूंना फॉलो करणाऱ्यांची आकडेवारी जास्त आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने याबाबत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

सोशल मीडियावर १० कोटी पेक्षा जास्त विराट कोहलीचे फॉलोअर्स आहेत. क्रिकेट हा खेळ जगात फुटबॉल आणि टेनिस एवढा लोकप्रिय नाही तरीही विराट कोहलीचे सोशल मीडियावर एवढे फॉलोअर्स असणे मोठी बाब आहे. फेसबुक, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम यावरील मिळून विराट कोहलीचे १० कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

फेसबुकवर ३.७१ कोटी, टि्वटरवर २.९ कोटी आणि इंस्टाग्रामवर ३.३५ कोटी लोक कोहलीला फॉलो करतात. याबाबतीत सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनला सोशल मीडियावर एकूण ७.१७ कोटी लोक फॉलोअर आहेत. टि्वटरवर २.९ कोटी, इंस्टाग्रामवर १.४७ कोटी आणि फेसबुकवर २.८ कोटी लोक फॉलो करतात. फुटबॉलचा विचार केल्यास ख्रिस्तियानो रोनाल्डोला सर्वाधित ७.७ कोटी फॉलोअर्स आहेत. तर नेमार ज्युनियर ला ४.३ कसोटी लोक फॉलोअर्स आहेत.

Leave a Comment