सशाच्या या कलाकृतीने लिलावात कायम केला रेकॉर्ड


आजवर आपण जगभरातील अनेक कलाकृती पाहिल्या असतील पण त्या विश्वास नाही बसणार एवढ्या किंमतीला विकल्या जातात. त्यातच आता एका सशाची कलाकृती रेकॉर्ड ब्रेक किंमतीला विकली गेली आहे. हि कलाकृती तब्बल ६३७ कोटी रूपयांना विकली गेली आहे. ही रॅबिटची कलाकृती अमेरिकन कलाकार जेफ कूंस यांनी स्टीलपासून तयार केली आहे. या कलाकृतीने मागचे सगळे विक्रम मोडीत काढून सर्वात महागडी कलाकृती होण्याचा विक्रम रचला आहे.

या संदर्भातील वृत्त सीएनएनने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार बुधवारी सायंकाळी केवळ ३ फूट उंच या कलाकृतीवर लिलावात बोली लावली गेली होती. अंदाजे ५ ते ७ कोटी डॉलर्स रुपये या चेहरा नसलेल्या रॅबिटची किंमत लावण्यात आली होती. पण ८ कोटी डॉलर्सपर्यंत ही बोली पोहोचली. तर ही कलाकृती शेवटी ९१,०७५,००० डॉलरला विकली गेली. मूर्तीमध्ये सशाच्या हाती एक गाजरासारखी वस्तू आहे.

या कलाकृतीला २०व्या शतकातील कलेची सर्वात प्रतिष्ठित कलाकृती बुधवारी लिलावाच्या आधी केले गेले होते. याचा प्रिव्ह्यू सुद्धा संकेस्थळावर दाखवण्यात आला होता. ही कलाकृती चेहरा नसल्यामुळे रहस्यमयी ठरते. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, आर्ट डीलर रॉबर्ट मनूचिनने ही कलाकृती खरेदी केली.

Leave a Comment