आर्थिकदृष्ट्या गरीब पण आनंदी देश भूतान


भारताच्या उत्तर सीमेवर भूतान हा एक छोटा देश असून भारतातील अरुणाचल प्रदेश भूतानच्या पूर्वेस, सिक्कीम पश्चिमेस, पश्चिम बंगाल दक्षिणेस असून व चीनमधील तिबेट उत्तरेस आहे. भूतानची थिंफू ही राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २००६ साली प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात आर्थिकदृष्ट्या गरीब असला तरी तो आशियातील सर्वात आनंदी तर जगातील ८वा सर्वात आनंदी भूतान हा देश आहे. आज आम्ही तुम्हाला भूतानबाबत काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही कधीच ऐकल्या नसतील.

विकासाचा रेशो मोजण्यासाठी १९७१ पासून केवळ जीडीपीचा आधार घेणे हे नाकारले आहे. विकासाच्या वेगवेगळ्या वाटा त्यांनी शोधल्या आहेत. त्यांनी आध्यात्मिक, शारीरिक, सामाजिक आणि पर्यावरण विकासाकडे अधिक प्राधान्य दिले आहे. कार्बन कंट्रोल करण्यासाठी जगभरातील वेगवेगळे देश हे धडपड करत आहेत. पण याची भूतानला अजिबात चिंता नाही. रिपोर्टनुसार, दरवर्षी १.५ मिलियन टन कार्बन भूतानमध्ये उत्सर्जित होतो. पण भूतान ६ मिलियन टन कार्बन दूर करू शकतो.

भूतानच्या संविधानात असा कायदा आहे की, देशाची जमीन जंगलाने ६० टक्के व्यापलेली असावी. रिपोर्ट्सनुसार, भूतान हा जगातील सर्वात जास्त जंगल परिसर असलेला देश आहे. येथील ७१ टक्के जमिनीवर जंगल आहे. देशाची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे पालन करण्यासाठी भूतानमधील लोक कामाच्या तासांवेळी पारंपारिक वेशभूषा परिधान करतात. त्यांना हीच वेशभूषा करावी लागते.

भूतान हा जगातील असा एकमेव देश आहे जिथे ट्रॅफिक लाइट नाहीत. भूतानमध्ये केवळ एक ट्रॅफिक सिग्नल थिम्पुमध्ये आहे आणि येथे हातांच्या माध्यमातून ट्रॅफिक कंट्रोल केले जाते. अजूनही भूतानमध्ये रेल्वे सेवा नाही. यासाठी मदत करण्यासाठी भारताने हात पुढे केला होता. पण अजून यावर काहीही झाले नाही. अजूनही भूतानमध्ये केवळ रस्ते आणि हवाई मार्गाने वाहतूक होते. भूतानमध्ये नौसेना नाही. तसेच त्यांच्याकडे एअरफोर्सही नाही. त्यांना इमर्जन्सीमध्ये भारतीय एअरफोर्सकडून मदत केली जाते.

भूतान हा प्लास्टिकवर पहिल्यांदा बंदी घालणाऱ्या काही मोजक्या देशांपैकी एक आहे. इथे १९९९ मध्येच प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली होती. भूतान हा टोबॅको कंट्रोल लॉ असलेला मोजक्याच देशांपैकी एक आहे. तसेच इथे सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास तसेच तंबाखू खाण्यावरही बंदी आहे. रविवारी भूतानमध्ये सगळ्या गोष्टींना सुट्टी असते. या दिवशी लोक पेपरही वाचत नाही.