
दिग्दर्शक रेमो डिसोझाच्या ‘एबीसीडी’ आणि ‘एबीसीडी २’ या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या धमाकेदार यशानंतर या सिरीजचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे ‘स्ट्रीट डान्सर’ असे शीर्षक आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला काही दिवसांपूर्वीच सुरूवात झाली असून चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.
वरुण धवनच्या ‘स्ट्रीट डान्सर’चे दुसरे शेड्युल सुरु
चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलला आता सुरूवात झाली असून आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत याबद्दलची माहिती वरूणने दिली आहे. वरूण या फोटोत जीममध्ये डंबेल्ससोबत पोज देत आहे. त्याचा हा फोटो पाहता वरूण सध्या फिटनेससाठी प्रचंड मेहनत घेत असल्याचे दिसत आहे.
या चित्रपटाचे पंजाबमधील चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. वरूणसोबत या चित्रपटात श्रद्धा कपूर झळकणार असून अनेकदा तीदेखील डान्सचा सराव करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. या चित्रपटाचे दिग्दर्शन नृत्य प्रभूदेवा करत आहेत.
