आलियाने दिली ‘सडक २’च्या चित्रीकरणाची माहिती


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला बॉलिवूडमध्ये एकेकाळी सुपरहिट ठरलेल्या ‘सडक’ चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. पुजा भट्ट आणि संजय दत्त ही जोडी १९९१ मध्ये आलेल्या सडक चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. ‘सडक २’मध्ये आता अभिनेत्री आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर ही जोडी झळकणार आहे.

पुजा भट्ट आणि संजय दत्तच्याही भूमिका चित्रपटाच्या सिक्वलमध्ये पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला शनिवारी सुरूवात झाली असून याबद्दलची माहिती आलियाने भावनिक पोस्ट शेअर करत दिली आहे. महेश भट्ट यांच्या हातात असलेल्या क्लॅपचा फोटो आलियाने शेअर केला. हे माझे वडील आहेत जे सध्या माझ्या चित्रपटाचे दिग्दर्शकही आहेत. या चित्रपटासाठी काम करताना एक लहान उंदीर सुंदर, भावनात्मक आणि प्रचंड मोठा डोंगर चढत असल्यासारखे वाटत असल्याचे तिने म्हटले आहे.

हा डोंगर चढून मी वरती पोहोचेल अशी मला अपेक्षा आहे. पण तो पार करताना मी पडले तरीही पुन्हा उठून नव्याने चालायला सुरूवात नक्की करेल. हा एक कठीण टप्पा असला तरीही जेवढे मी ऐकले आणि पाहिले आहे त्यावरून प्रत्येक चुकीच्या पावलाचेही मुल्य असते, असे म्हणत तिने चित्रीकरणाला सुरूवात करणार असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment