२३ मे रोजीच सर्व एक्झिटची ‘पोल खोल’ – शशी थरूर


नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी सर्व माध्यमांनी वर्तवलेल्या एक्झिट पोल चुकीचे असून खरा निर्णय २३ मे रोजी समोर येईल, असा दावा केला आहे.

माझा एक्झिट पोलवर विश्वास नाही. कारण ऑस्ट्रेलियातील ५६ वेगवेगळे एक्झिट पोल मागच्या आठवड्यामध्ये चुकीचे ठरले गेले आहेत. भीतीमुळे आपल्या देशातीस बरेच लोक सत्य सांगत नसल्यामुळे २३ मे पर्यंत खऱ्या रिझल्टसाठी वाट पाहा, असे ट्विट शशी थरुर यांनी केले आहे. तर, दुसऱ्या ट्विटमध्ये जसे एक्झिट पोल ऑस्ट्रेलियात चुकीचे ठरले तसेच ते भारतातही ठरतील, असे ते म्हणाले. १७ व्या लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया रविवारी २० मे रोजी पार पडली. विविध माध्यम आणि संस्थांनी त्यानंतर एक्झिट पोल सादर केले. यामध्ये एनडीए प्रणीत भाजप सरकार पुन्हा एकदा येताना दिसत आहे.

Leave a Comment