फेसबुकसाठी क्रिप्टोचलन विकसित करणार लिब्रा नेटवर्क


सॅन फ्रान्सिस्को – आता फेसबुकदेखील इंटरनेटविश्वात आभासी चलन असलेल्या क्रिप्टोचलनाच्या व्यवसायात उतरणार असून फेसबुकसाठी स्वित्झर्लंडमधील लिब्रा नेटवर्क ही कंपनी पेमेंट व्यवस्थेसह ब्लॉकचेन यंत्रणा विकसित करणार आहे. डॉलरशी फेसबुकचे क्रिप्टोचलन हे संलग्न राहणार असल्यामुळे ते स्थिर राहणार आहे. ते बिटकॉईनसारखे ढासळणार नाही, असे अमेरिकेतील माध्यमाने म्हटले आहे.

काही आठवड्यापूर्वी लिब्रा नेटवर्कची फेसबुकने जीनिव्हामध्ये सुरुवात केल्याचे अमेरिकेच्या माध्यमांनी म्हटले होते. फेसबुकचा लिब्रा हा अंतर्गत प्रकल्प आहे. डिजिटल चलन या प्रकल्पातून विकसित केले जाणार असल्याचे वृत्तात म्हटले होते. डिजिटल चलनासाठी लागणारे पेमेंट, ब्लॉकचेन, अॅनालिटीक्स आणि बिग डाटा लिब्रा कंपनीकडून विकसित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सॉफ्टवेअर व हार्डवेअरदेखील विकसित करण्यात येणार आहे. सुमारे १२ वित्तीय संस्था आणि ऑनलाईन मर्चंटस फेसबुक नोकरीत घेत असल्याचे अमेरिकेतील माध्यमाने यापूर्वी म्हटले होते. तर दुसऱ्या एका माध्यमानेदेखील आभासी चलनावर फेसबुकची ५० जणांची टीम काम करत असल्याचे म्हटले होते. यावर फेसबुकने प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘हॉवर्ड लॉ’च्या प्राध्यापकांना दिलेल्या मुलाखतीत फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यानेदेखील ब्लॉकचेनच्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची इच्छा असल्याचे म्हटले होते. अधिकृतपणा विकेंद्रीकरण अथवा ब्लॉकचेनला देण्याबाबत विचार करत असल्याचे मार्कने म्हटले. त्याबाबत नेमके कोणत्या पद्धतीने करायचे हे निश्चित केलेले नाही. मात्र अधिकृतपणा देण्यासाठी विविध सेवांचा वापर होवू शकतो, असे मार्कसने स्पष्ट केले होते. जगभरात फेसबुकचे २३८ कोटी वापरकर्ते आहेत. क्रिप्टोचलनाची सुरुवात फेसबुकने केल्यास अनेक ऑनलाईन व्यवहार वापरकर्त्यांना करता येणे शक्य होणार आहे.

Leave a Comment