सैफ, सोनालीसह इतर कलाकारांना काळवीट शिकारप्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस


मुंबई – राजस्थान उच्च न्यायालयाने काळवीट शिकारप्रकरणी निर्दोष सुटलेल्या कलाकारांना नव्याने नोटीस पाठवली आहे. अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम कोठारी आणि दुश्यंत सिंग यांना जोधपूरच्या सत्र न्यायालयाने याप्रकरणी दोषमुक्त केले होते. तर सहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सलमानला सुनावली होती.

राजस्थान सरकारने जोधपूर सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात इतर कलाकारांना निर्दोष मुक्त केल्याने उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे, राजस्थान उच्च न्यायालयाने आता या पाच जणांना नोटीस पाठवली असून आठ आठवड्यानंतर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

दोन काळवीटांची ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान १-२ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री शिकार केल्याचा सलमान खानवर आरोप आहे. सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे शिकारीच्या वेळी तिथे उपस्थित होते.

Leave a Comment