मराठमोळा दिग्दर्शक करणार भन्साळींच्या चित्रपटाचे दिग्दर्शन


भव्य दिव्य चित्रपटांसाठी ओळखले जाणारे संजय लीला भन्साळी लवकरच एक चित्रपट घेऊन तुमच्या भेटीला येत आहेत. ‘मलाल’ असे या चित्रपटाचे नाव आहे. ‘७ जी रेनबो कॉलनी’ या तमिळ चित्रपटाचा हा चित्रपट रिमेक आहे. त्याचबरोबर संजय लीला भन्साळी या चित्रपटाची निर्मिती करणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक करणार आहे. या चित्रपटातून भन्साळी दोन नव्या चेहऱ्यांना बॉलीवूडमध्ये लाँच करणार आहेत.

या चित्रपटात संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मिन सहगल आणि अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान ‘मलाल’ दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला होता. २८ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मलाल’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मुंबईच्या चाळीत राहणारा मराठी मुलगा आणि उत्तर भारतीय मुलगी यांची प्रेमकथा या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.

मंगेश हाडवळे यांनी ‘मलाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. २००८मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘टिंग्या’चे दिग्दर्शन मंगेश हाडवळे यांनी केले होते. ‘टिंग्या’ आणि ‘देख इंडियन सर्कस’ ( हिंदी ) ह्या चित्रपटांना अनेक राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय पारितोषिके मंगेश यांना याआधी मिळालेली आहेत.

Leave a Comment