249 रुपयांमध्ये टाटा स्कायच्या या स्टिकच्या मदतीने पाहा तुमचे आवडते कार्यक्रम


सध्याच्या घडीला प्रत्येकाच्याच घरी सेट टॉप बॉक्स असतील यात काही शंका नाही पण यापुढे तुम्हाला तुमचे आवडते कार्यक्रम पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्सची गरजच भासणार नाही. कारण टाटा स्काय या कंपनीने एक फायर स्टिक टीवी लॉन्च केली आहे. ज्यामुळे टीव्ही पाहण्यासाठी सेट बॉक्सवर तुम्हाला अवलंबून रहावे लागणार नाही. तुम्ही अॅमेझोन फायर टिव्ही स्टिकच्या माध्यमातून टाटा स्काय Binge या सेवेचा लाभ घेऊ शकता. यात एअरटेलसुध्दा अॅमेझोन फायर टिव्ही स्टिकच्या माध्यमातून प्रीमियम कंटेंट देते. अॅमेझोन फायर टिव्ही स्टिकचा या सेवेचा लाभ घेण्यासाठी टाटा स्काय एडिशन ग्राहकाला खरेदी करावे लागेल. ज्यासाठी प्रतिमहिना 249 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

ग्राहकांना या सेवेच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या अॅप बेस्ड प्रीमियम कंटेटही अॅक्सेस करता येईल. Hotstar, Eros Now, Sun NXT, Hungama यांसारखे अनेक व्हडिओ कार्यक्रमही यात प्रीमियम ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवेमध्ये पाहता येणार आहेत. आपण आपल्या LED किंवा LED स्मार्ट टीव्हीच्या HDMI पोर्टचा वापर टाटा स्काय Binge फायर स्टिक टिव्हीची सेवा घेण्यासाठी करावा लागेल. अॅमेझोन फायर टिव्ही स्टिकसोबत टाटा स्काय Binge अॅपला इंटिग्रेट करण्यात आले आहे. आपल्याला ज्यामुळे मध्ये टाटा स्काय Binge अॅप देण्यात आले आहे. यूजर्स ज्याच्या माध्यमातून कार्यक्रम पाहू शकतात.

VOD लायब्ररीही टाटा स्कायने या सेवेच्या माध्यमातून दिली आहे. 5,000 टाईल्स ज्यात दिल्या आहेत. आपण या फायर स्टीक टीव्हीच्या माध्यमातून 1,00,000 तासांचे कार्यक्रम दिले आहेत. यात आपण हॉलिवूड, बॉलिवूड सोबतच स्थानिक कार्यक्रमही पाहू शकता. यासोबतच आपण लोकप्रिय टीव्ही मालिका आणि किड्स कार्यक्रमही पाहू शकता. टाटा स्काय Binge अॅप या अॅमेझोन फायर टिव्ही स्टिकमध्ये देण्यात आले आहे. युजर्स ज्याच्या माध्यमातून कार्यक्रम पाहू सकतात.

यूजर्ससाठी या फायर टीव्ही स्टीकसोबत लॉन्च ऑफरही ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना ज्याच्या माध्यमातून 3 महिन्यांसाठी Amazon Prime सब्सक्रिप्शन ऑफर उपलब्ध आहे. या टीव्ही स्टीकचा वापर करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला अॅमेझोन फायर टिव्ही स्टिक आपल्या टीव्हीला जोडावी लागेल. त्यानंतर आपल्याला Tata Binge अॅपच्या सहाय्याने अॅप कार्यरत करावे लागेल. आपल्या हे अॅप अॅक्टिवेट करण्यासाठी टीव्ही स्किनवर अॅमेझोन फायर टिव्ही स्टिक कॉन्फीगर करण्यासाठी पर्याय उपलब्ध असेल.

दरम्यान, या सेवेचा लाभ घेण्यासाठी इंटरनेट अत्यंत आवश्यक आहे. आपल्या घरी जर वाय-फाय कनेक्शन आहे. तर आपण ही सेवा घेऊ शकता. ही सेवा घेण्यासाठी आपल्या जवळ अॅमेझोन अकाऊंट असणेही आवश्यक आहे. अॅमेझोन अकाऊंटवर लॉग-इन करताच आपण टाटा स्काय Binge अॅप डाऊनलोड करु शकता. अॅप डाऊनलोड केल्यानंतरच आपण ही प्रणाली कार्यरत करु शकता. टाटा स्कायची आयडी अॅपमध्ये OTP आणि ई-मेल आयडी नोंदवावा लागेल. ही प्रक्रीया पूर्ण झाल्यावर तुम्ही सर्व कार्यक्रम आरामात पाहू शकता.

Leave a Comment