Offline पद्धतीने असे वापरा Google Map


अनोळखी जागी प्रवास करताना एखादे ठिकाण शोधण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण गुगल मॅपचा वापर करतात तुम्हाला या मॅपच्या आधारे लोकेशनसह रस्त्यांचा मार्ग कसा आहे याची माहिती देखील दिली जाते. पण गुगल मॅप वापरण्यासाठी इंटरनेट सुरु असणे अनिवार्य असते.

पण तुम्हाला माहित नसेल गुगल मॅप हे ऑफलाईन देखील वापरले जाऊ शकते. त्याचबाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही ऑफलाईन गुगल मॅप वापरु शकता.

यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप अॅप डाऊनलोड करावे लागले. मॅप डाऊनलोड केल्यावर तेथे Sign In हे ऑप्शन दिसेल. साईन ईन केल्यावर तुम्हाला जिथे जायचे आहे त्या ठिकाणचे नाव सर्च करा. ठिकाण सर्च केल्यानंतर डाऊनलोड ऑफलाईन मॅपवर टॅप करा. तर Incognito mode लवकरच गुगल मॅप आणि सर्चसाठी लॉन्च करण्यात येणार आहे. हे मोड तसेच लवकरच यु ट्युबसाठी सुद्धा उपलब्ध होईल.

Leave a Comment